Incentive Grant । राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (Incentive Grant for Farmers) देण्याची घोषणा केली आहे. पण शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. आतुरतेने ते सरकारी अनुदानाची वाट पाहत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी या अनुदानासाठी आंदोलनही केले होते. अशातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
खात्यात जमा होणार 50 हजार रुपये
लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील 14 हजार 800 शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जमा केले जाणार आहे. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे प्रोत्साहनपर अनुदान वितरण थांबवण्यात आले होते. पण आता त्यात दुरुस्ती करण्यात आली आहे.
इतकेच नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना अनुदान मिळेल याची खात्री देखील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सह्यांनी आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 40 कोटी रुपये कोल्हापूर महापालिकेलावर्ग केले आहेत.
E-Peak Inspection । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी सवलतींसाठी ई-पीक पाहणी अनिवार्य
अजित पवार यांनी 2022 मध्ये 45 कोटी रुपयांची घोषणा केली होती. यापैकी 5 कोटी रुपये मंजूर झाले होते आणि 40 कोटी रुपयांचा निधी रखडला होता. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच या मागण्या मान्य केल्या असल्याने आता शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत.
Sugarcane FRP । एफआरपी कितीही वाढवला तरी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार