Havaman Andaj

Havaman Andaj । सर्वात मोठी बातमी! राज्यातील 18 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

हवामान

Havaman Andaj । सध्या अवकाळी पावसाने राज्यभर थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पीके पावसामुळे नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान राज्यातील अनेक भागात आजही पाऊस पडू शकतो असा अंदाज हावामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 18 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Success Story । ही 23 वर्षांची मुलगी ओसाड जमिनीतून सोने उगवते, वाचा तरुणीची यशोगाथा

हवामान विभागाने अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर या चार जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर राज्यातील 18 जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Potato and rice prices । अवकाळी पावसाने पिकांची नासधूस, कांद्यापाठोपाठ बटाटे आणि तांदळाचे भाव वाढले

मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, सातारा, पुणे, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे तर मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. विदर्भातील यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यालाही येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.

Unseasonal Rain । अवकाळी पावसाने टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त, शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून शेतकऱ्यांनी आपल्या शेत पिकाची योग्य ती काळजी घ्यावी असे आव्हान देखील कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. सध्या बरसात असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

Havaman Andaj । अवकाळी पाऊस घालणार थैमान, मराठवाड्यासह नाशिकमध्ये गारपिटीचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *