Havaman Andaj । येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

हवामान

Havaman Andaj । मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकरीवर्गाला बसत आहे. यंदाही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. (Heavy rain) ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली. तर हिवाळयात काही भागात अवकाळी पावसाने (Rain update) थैमान घातले. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Rain update in Maharashtra)

Success Story । नाद नाही करायचा..1 एकर आल्यातून शेतकऱ्याने कमावले 10 लाख रुपये; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

जानेवारी महिन्यात संपूर्ण देशासह राज्यात कडाक्याची थंडी पडते. परंतु, यंदा मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्याची सुरुवात होऊनही काही ठिकाणी पाऊस पडत आहे. अशातच आता हवामान खात्याने (IMD Alert) महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा धोका बसणार असल्याचे सांगतिले आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. (Rain in Maharashtra)

Government Schemes । मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 36 हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज

24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासात तमिळनाडू किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कराईकल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ, आणि लक्षद्वीपमध्येदेखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Agriculture Well । सरकारी योजनेअंतर्गत राज्यात पाच वर्षांत दहा लाख सिंचन विहरींचे उद्दिष्ट

या ठिकाणी पडणार जोरदार पाऊस

आज उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे संपूर्ण उत्तर भारत आणि जवळच्या काही भागातील वातावरणावर परिणाम होईल. आज लडाख, गिलगिट,जम्मू, काश्मीर, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी होईल. तसेच छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, तेलंगणा आणि रायलसीमा या भागातदेखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Government schemes । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे अनुदान

आज उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, चंदीगड, अंदमान आणि निकोबार बेटे, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख, पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात, कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भातदेखील विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Milk production । ‘या’ देशात केले जाते सर्वात जास्त दूध उत्पादन; वाचा बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *