Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यभर पावसाची उघडीप, नागरिकांना सोसावे लागणार उन्हाचे चटके; वाचा हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

हवामान

Havaman Andaj । देशासह राज्यभर मागच्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये पावसाने मागच्या काही दिवसापूर्वी अक्षरशः थैमान घातले होते. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी तर पूरसदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली. मात्र आता देशासह राज्यातून मान्सून परतीचा प्रवास सुरू केला असल्याचे दिसत आहे.

Crop Insurance । पैसे घेऊन पंचनामे न करणाऱ्या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी घडवली अद्दल, हात बांधले आणि…

नैऋत्य मोसमी वारे यांची परतीची वाटचाल सुरू झाली असून मान्सून ने मंगळवारपासून संपूर्ण राज्यस्थान सह गुजरातच्या काही भागातून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर येत्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून वारे परतण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे.

Kisan Loan Portal । कर्ज मिळवणे झाले आणखी सोपे! सरकारने खास शेतकऱ्यांसाठी आणले एक पोर्टल

सध्या राज्यभर पावसाने उघडीप दिली असून निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊन उन्हाचा चटका चांगलाच वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात तापमान ३४ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. दरम्यान आज कोकणात तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये पाऊस उघडीप देणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

Udid Rate । दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उडदाल किती भाव मिळाला? वाचा एका क्लिकवर

शेतकऱ्यांच्या कामाला गती

मागच्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची कामे रखडली होती. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नव्हते. मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची शेतातील कामासाठी लगबग सुरू झाली आहे. काही शेतकरी सोयाबीन काढत आहेत तर काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड सुरू केली आहे. अशी अनेक शेतकऱ्यांची कामे सध्या सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

Onion Rate | लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला आज किती दर मिळाला? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *