Havaman Andaj । देशातील काही राज्यांमध्ये हवामानात बदल झाल्याने हलक्या थंडीला सुरुवात झाली आहे. भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. मैदानी भागात कोरडे हवामान आहे. तर, डोंगरावर बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मतानुसार, देशातील 8 नोव्हेंबर 2023 पर्यंत बहुतेक राज्यांत मुसळधार पावसासह (IMD Alert) जोरदार वारे वाहू शकतात. जाणून घेऊयात आजची देशभरातील हवामानाची (IMD) स्थिती.
दरम्यान, राज्यात गारठा काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ढगाळ हवामानामुळे दुपारच्या वेळी नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. हवामान खात्याच्या मतानुसार आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत जोरदार वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा कायम आहे.
Government Schemes । ‘या’ लोकांची दिवाळी होणार गोड! मिळणार 4,500 रुपयांचा आर्थिक लाभ
असे असेल हवामान
हवामान खात्याच्या माहितीनुसार, किनारी कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, रायलसीमा, केरळ, लक्षद्वीप आणि तामिळनाडूमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पडतो. तटीय आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेट आणि ओडिशामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 7 नोव्हेंबर पर्यंत जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबादमध्ये विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 8 नोव्हेंबर दरम्यान कर्नाटक, नाडू, पुद्दुचेरी, केरळ-माहे आणि कराईकल; रायलसीमा आणि दक्षिण भारतात हलका ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
इतकेच नाही तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतांश भागात 9 नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसासह हलकी बर्फवृष्टी होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे देशातील उर्वरित भागात हवामानात कोणताही विशेष बदल नसेल. याशिवाय सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Namo Shetkari Yojana । तुम्हालाही घेता येणार 12 हजारांचा लाभ, पण मान्य करावी लागेल ‘ही’ अट