Havaman Andaj । देशातून मान्सूने परतीचा प्रवास सुरू केला आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही पाऊस काही ठिकाणी सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये पाऊस परतीची वाट धरणार असल्याचे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र त्यापूर्वी राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Havaman Andaj । मान्सून परतीच्या प्रवासाला लागला? पाहा पुढील 48 तासांसाठीचा हवामान अंदाज
या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोकण आणि विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील 48 तासांमध्ये पुणे आणि मुंबई या ठिकाणी पावसाच्या अधून मधून जोरदार सरी कोसळणार आहेत. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील क्षेत्रामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पाऊस कोसळताना दिसत आहे.
Rose Farming । गुलाब लागवडीचा योग्य काळ कोणता? कोणत्या सुधारित वाणांची निवड करावी? जाणून घ्या माहिती
देशातील मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
सध्या देशातील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून राजस्थान, दिल्ली, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंडमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांमधून मान्सूनने काढता पाय घेण्यास देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागणार आहे.
दरम्यान, IMD ने दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालयमध्ये पुढचे दोन दिवस पावसाचा जोर असणार वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर ही उत्तर हिमालय क्षेत्रामध्ये देखील काही भागांमध्ये पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.