Havaman Andaj

Havaman Andaj । महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

हवामान

Havaman Andaj । मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकरीवर्गाला बसत आहे. यंदाही शेतकऱ्यांना पावसाचा (Rain Update) फटका बसला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाने राज्याच्या (Rain in Maharashtra) काही भागात पाठ फिरवली. तर हिवाळयात काही भागात अवकाळी पावसाने (Heavy rain) थैमान घातले. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Government schemes । खुशखबर! लहान शेतकऱ्यांनाही मिळेल तलाव खोदण्यासाठी अनुदान, असा करा अर्ज

सध्या जानेवारी महिना सुरु आहे. या महिन्यात संपूर्ण देशासह राज्यात कडाक्याची थंडी पडते. परंतु, यंदा मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्याची सुरुवात होऊनही काही ठिकाणी पाऊस (Rain Update in Maharashtra) पडत आहे. अशातच आता हवामान खात्याने महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा धोका बसणार असल्याचे सांगतिले आहे.(Maharashtra Weather Update Today)

Cabinet Meeting । दुधाच्या ५ रुपये अनुदानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय!

मुंबईत थंडीचा कडाका कमी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज दक्षिण कोकणात तुरळक पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये देखील थंडीचा कडाका कमी असेल. कुलाबा केंद्रात 27.5 अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझ केंद्रात 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईकरांना थंडीचा कडाका कमी जास्त जाणवत आहे.

Eicher 188 Tractor । उत्तम मायलेज आयशर 188 ट्रॅक्टर 3 लाखांच्या रेंजमध्ये; जाणून घ्या वैशिष्ट्ये

या ठिकाणी पडणार पाऊस

मुंबईत पहाटे धुके, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण आहे. परंतु, पुढील चार ते पाच दिवस मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर महत्वाच्या शहरात पावसाच्या हलक्या सरी पडतील. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये दोन दिवस तर रायगडमध्ये रविवारी हलका पाऊस पडू शकतो.

Mahanand Dairy । महानंद वाचवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावे, किसान सभेचा इशारा

याशिवाय, धुळे आणि नंदुरबार येथे तीन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. अहमदनगर, पुणे, जळगाव, नाशिक,कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पावसाची शक्यता आहे.

Farmer success story । जिद्दीला सलाम! 10 बाय 20 च्या झोपडीत केली मशरुमची शेती, कसं केलं नियोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *