Havaman Andaj । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पुढच्या तीन दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत पडणार मुसळधार पाऊस

हवामान
Havaman Andaj

Havaman Andaj । यंदा पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने (Rain Update) पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याविना पिके जळून गेली आहेत. तर मागील काही महिन्यांपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. अशातच पुढच्या तीन दिवसांत काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे. (Havaman Andaj Today)

Bank Loan । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ कामासाठी बँक ऑफ महाराष्ट्र देणार लाखांचे कर्ज

या ठिकाणी पडणार पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवार (दि. ६ एप्रिल) ते मंगळवार (दि. ९ एप्रिल) म्हणजे गुढीपाडवापर्यंत महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण राहील.(IMD Rain Alert) गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी विदर्भातील गोंदिया, भंडारा नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात आणि लगतच्या परिसरात अवकाळी पावसाची जास्त शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक काढणीच्या कामाचे नियोजन करावे, असा सल्ला हवामान खात्याने (IMD Alert) दिला आहे.

Sorghum Market । शेतकऱ्यांना अच्छे दिन! पांढऱ्या ज्वारीला मिळतोय हंगामातील सर्वात जास्त भाव

दरम्यान, मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्हा परिसर ते कर्नाटक ओलांडून दक्षिण तामिळनाडूतील मदुराई जिल्हा परिसरापर्यंतच्या समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत व काही किलोमीटर रुंदीत असणाऱ्या हवेच्या कमी दाबाचा आसाचे म्हणजेच वारा खंडितता प्रणालीत पसरलेल्या क्षेत्रात दोन्हीही, अरबी आणि बंगालच्या उपसागरातून उच्च दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय आर्द्रतायुक्त पण विरुध्द दिशेने ताशी २० ते २५ किमी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या संगमामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आहे.

LPG Cylinder । सर्वसामान्यांना निवडणुकीची भेट, आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर इतक्या रुपयांनी झाले कमी

तसेच मुंबईसह कोकणात साधारणपणे दुपारचे कमाल तापमान सरासरी म्हणजे ३२ ते ३३ डिग्री से. ग्रेड च्या आसपास तर पहाटेचे किमान तापमान सरासरी म्हणजे २२ ते २४ डिग्री से. ग्रेडच्या आसपास असेल. विशेष म्हणजे राज्यात उष्णतेची ही सर्व स्थिती आजपासून ३ दिवस म्हणजे ६ एप्रिल पर्यंत जाणवणार आहे. विदर्भात काही ठिकाणी दिवसा उष्णतेच्या लाट तर रात्री उकाड्याची स्थिती जाणवेल.

Paddy Compensation । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार २५ लाख रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *