Havaman Andaj

Havaman Andaj । नागरिकांनो, सावधान! हवामान खात्याचा ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान

Havaman Andaj । यंदा देशात पावसाने उशिरा हजेरी लावली होती. त्यात काही भागांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पावसाविना पिके जळू लागली आहेत. हवामानात बदल झाल्याने देशाच्या काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. अशातच आता हवामान खात्याकडून पावसाबाबत मोठी अपडेट (IMD Update) देण्यात आली आहे.

Success Story । शेतकऱ्याची लै भारी कमाल! एक एकर आल्यातून केली १२ लाखांची कमाई

मागील 24 तासांबद्दल बोलायचे झाले तर अंदमान आणि निकोबार बेट, केरळ, तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत, हवामान खात्याच्या मतानुसार, (IMD Alert) येत्या 24 तासांत देशभरात हवामान कसे असणार? जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.

Maharashtra Drought । दुष्काळग्रस्त तालुक्यांना कोणत्या सवलती मिळणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर

कसे असणार हवामान?

येत्या 24 तासांत, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, किनारी कर्नाटक आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, अशी हवामान खात्याने (IMD) शक्यता वर्तवली आहे. लक्षद्वीप, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस पडेल. छत्तीसगड आणि ओडिशामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. इतकेच नाही तर 3 नोव्हेंबरपर्यंत पश्चिम हिमालयात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होईल.

Agriculture News । पैसेवारी म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या दुष्काळाशी असणारा संबंध

दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकात कोणतीही सुधारणा होण्याची शक्यता नाही. दिल्ली-एनसीआरचे वायू प्रदूषण अतिशय वाईट ते गंभीर श्रेणीत असणार आहे.

Lek Ladki Yojana । गोरगरीब मुलींना मिळणार लाखो रुपये, काय आहे सरकारची भन्नाट योजना? जाणून घ्या

राजस्थानचे हवामान

हवामान खात्याच्या मतानुसार, राजस्थानमध्ये पावसाची शक्यता नाही. देशाच्या बहुतांश भागात नोव्हेंबर महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्तराहील. उत्तर-पश्चिमच्या काही भागात तशी शक्यता नाही. या ठिकाणी हवामान थंड असेल.

Crop Milling । मळणी यंत्राद्वारे पीक काढणी करताय? घ्या आवश्यक खबरदारी, अन्यथा होईल मोठे नुकसान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *