Havaman Andaj । सध्या राज्याच्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापासून हा पाऊस सुरु झाला आहे आता गणपतीला निरोप देण्याची वेळ आली आहे. तरीदेखील पाऊस सुरूच आहे. पुण्यामध्ये देखील मागच्या पाच-सहा दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान रात्री देखील पुणेकरांना पावसाने चांगलेच झोडपले आहे.
Chili Market । हिरव्या मिरचीचे भाव पडल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत; मिळतोय फक्त ‘इतका’ दर
रात्री साडे सात वाजता जोरदार पावसाला सुरवात झाली असून पुणेकरांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. पुण्याच्या अनेक भागात रात्री तुफान पाऊस बरसला आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज देखील पुण्याच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्याच्या विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान यंदाच्या वर्षी मान्सून उशिरा आला असून परतीचा प्रवास देखील उशिराच सुरु झाला आहे. राजस्थानमधून पाऊस परतीला लागला असून महाराष्ट्राला १० ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली आहे. मात्र त्याआधीच तो महाराष्ट्र जाईल असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.
Onion Rate । कांद्याला आज किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
नदी नाल्यांना पूर
राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. ग्रामीण भागात देखील चांगला पाऊस झाला आहे. या ठिकाणचे नदी नाले देखील फुल्ल झाले आहेत. ना शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे.