Havaman Andaj । मागच्या काही दिवसापासून राज्यातील वातावरणामध्ये मोठे बदल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नागरिकांना कधी कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे तर कधी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तर कधी पाऊस देखील होत आहे. दरम्यान आता राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागात विजांच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस कोसळत आहे. येत्या तीन-चार तासात अवकाळी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. (Havaman Andaj )
हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला असून शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी असे आव्हान देखील करण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार. सातारा, बीड, मुंबई ,रायगड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देखील हावामान विभागाने दिला आहे. तर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक मध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Tomato Rate । टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! टोमॅटोचे दर वाढले, मिळतोय इतका भाव
उत्तर महाराष्ट्रसह राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाल्याची देखील माहिती मिळत आहे. दरम्यान आज विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसासह गारपीट (Hailstorm Forecast) होण्याचा इशारा देखील हावामान विभागाने वर्तवली आहे.
देशभरातील हवामान कसे असेल?
स्कायमेट हवामान अहवालानुसार, पुढील २४ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण गोवा, गुजरात, राजस्थानचा काही भाग आणि दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर हलक्या ते मध्यम पावसासह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याचे म्हणणे आहे की, 28 नोव्हेंबर 2023 रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या विविध भागात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD च्या अहवालानुसार, 28 ते 29 नोव्हेंबर दरम्यान आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या अंदमान समुद्रावर ताशी 65 किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.