Havaman Andaj । गेल्या काही दिवसापासून सतत बरसत असणाऱ्या पावसाने मुंबई आणि नवी मुंबई भागात काहीशी विश्रांती दिली असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या ठिकाणी पावसाने विश्रांती दिली असली तरी हा पाऊस कोकण आणि विदर्भात मात्र मुसळधार कोसळताना दिसत आहे. त्यामुळे आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा पाऊस आता टप्प्याटप्प्याने त्याचा परतीचा प्रवास सुरू करणार आहे. त्यामुळे असं असलं तरी देखील कोकण आणि विदर्भातून एवढ्या लवकर पाऊस विश्रांती घेणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. (Maharastra Rain Update)
Buldhana Rain । मुसळधार पावसाने बुलढाण्याला झोडपले! १२५ घरांचे नुकसान तर ७६ जनावरे गेली वाहून
कोकणात मुसळधार पाऊस
तळकोकणासह कोकणातील इतर भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवस कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस दडी मारून बसला होता मात्र गेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांमध्ये नांदेड लातूरला देखील मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी काळजी घ्यावी, कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Onion Rate । सोलापूर बाजारसमितीत कांद्याला मिळाला आज ‘इतका’ दर; वाचा एका क्लिकवर
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. उत्तर भारतापासून ही सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे परतीचा प्रवास देखील उशिरा म्हणजे १० ऑक्टोबर नंतर सुरु होणार असल्याची माहिती हवामानाने दिली आहे. थोडक्यात बोलायचं झालं तर राज्यात सध्या मान्सूनचा पाऊस सुरू असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
Soybean Rate । आज सोयाबीनला किती दर मिळाला? जाणून एका क्लिकवर