Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! राज्यावर पुढचे 3 दिवस अस्मानी संकट; वादळी वाऱ्यासह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

Blog

Havaman Andaj । महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पाऊस पडत नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सर्वजण आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. राज्यात येत्या 3 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Ahmdnagar Rain News । अनेक दिवस ओढ दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यात तुफान पाऊस

‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

मागील आठवड्यापासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसाचा जोर आणखी ३ दिवस असेल. पुणे जिल्ह्यात आजपासून ३ दिवस मुसळधार पाऊस पडेल. विदर्भामध्ये वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर,नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. पुढचे तीन दिवस या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल.

Sitafal Rate । सीताफळाचे दर तेजीत; मिळतोय ९ हजार रुपये पर्यंत दर; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

दरम्यान, सिक्कीमपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे, त्यामुळे राज्यात दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या जोरदार आगमनाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक सुखावले आहेत. राज्यावरचे पिण्याच्या पाण्याचे संकट टळू शकते. पुन्हा एकदा रखडलेल्या पेरण्यांना सुरुवात होईल.

Harbhara Rate । हरभऱ्याला आज बाजारात किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

कामाशिवाय बाहेर पडू नका

शुक्रवारपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. आजही पुणे शहरात पावसाची संततधार सुरू आहे. कोकण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढच्या ३-४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *