Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला अलर्ट

हवामान

Havaman Andaj । देशासह राज्यातील हवामानावर वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे (Western Dirstbans) परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्याच्या हवामानात (Maharashtra Weather Forecast) मोठा बदल होत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा. राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो.

Agriculture Technology । भारीच! शेततळ्यात कुणी पडल्यास सेकंदात वाजणार अलार्म, विद्यार्थ्यांचा अफलातून शोध

पडणार मुसळधार पाऊस

हवामान खात्याचा अंदाजानुसार, आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वारे, विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Maharashtra Rain Update) पडू शकतो. त्याशिवाय राज्यात चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस (Rain Update) पडू शकतो. या पावसामुळे पिकांना पुन्हा एकदा उभारी मिळेल. परंतु काही जिल्ह्यात हवामान कोरडे असेल.

Havaman Andaj । सावधान! राज्यात उद्यापासून ‘या’ ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस

आज या ठिकाणी पडणार पाऊस

आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. नांदेड, नाशिक आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. दरम्यान, तमिळनाडूच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाला असल्याने हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Export Of Fruits And Vegetables । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सागरी मार्गाने होणार फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात

शनिवारी पुणे जिल्हा पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, जालना, बीड, लातूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो. महत्त्वाचे म्हणजे पुढील चार-पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण तयार होईल. तापमानात देखील घट होईल.

Jowar Rate । ज्वारी खातेय भाव! किलोला मिळतोय ६० ते ६५ रूपायांचा दर

त्याशिवाय हिंगोली, नांदेड, परभणी आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली, पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धारशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Pune Buffelo farming । पुण्यातील सर्वात मोठा म्हशीचा गोठा, दररोज ३०० लिटर दुध होत संकलित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *