Havaman Andaj

Havaman Andaj । ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

हवामान

Havaman Andaj । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा चांगलाच बसला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (Western Disturbance) प्रभावामुळे यंदा सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे (Changing climate) शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच आता हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता (IMD Alert) वर्तवली आहे.

Success Story । परभणीच्या शेतकऱ्याची कमाल! शेतात पिकवला चक्क 2 लाख 40 हजार रुपये किलो दराने विकला जाणारा आंबा

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

हवामान खात्याच्या (IMD) अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजपासून पुढील ३ ते ४ दिवस महाराष्ट्र दिल्ली, हरियाणा आणि पंजाबसह उत्तर भारतातील अनेक भागात गारपीटीसह अवकाळी पावसाची (Heavy rain) शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

Silk Farmer । सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या रेशीम उत्पादक शेतकऱ्याला मिळणार सरकारकडून पुरस्कार, असा करा अर्ज

वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता

महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये २४ फेब्रुवारीपासून ते २९ फेब्रुवारीपर्यंत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होऊ शकते. येत्या २४ तासांत अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट होऊ शकते. तसेच ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हलका पाऊस पडेल.

Samriddhi Yojana । आनंदाची बातमी! महिला समृद्धी योजनेतून मिळणार बचत गटांसाठी चार टक्के दराने व्याज

झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीममधील काही भागात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. उद्यापासून विदर्भासह मराठवाड्यात विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात पुन्हा वाढ होऊ शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Amul Dairy । 36 लाख शेतकऱ्यांशी नाळ जोडलेल्या अमूल डेअरीची 50 वर्ष पूर्ण, जाणून घ्या सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *