Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! ‘या’ ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस, राज्यात पुढील 48 तास पावसाचे; हवामान विभागाने दिला इशारा

हवामान

Havaman Andaj । गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून बरसणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा चांगला जोरदार धरला आहे त्यामुळे आता कोकण विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस बरसताना दिसत आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. यामुळे भंडारा, गोंदिया, रायगड, नागपूरमध्ये पाऊस तुरळक ते मध्यम स्वरूपाचा बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

Sarkari Yojna । सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला धडाकेबाज निर्णय! ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार रासायनिक खते

त्याचबरोबर राज्याच्या इतर भागात देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 25 आणि 26 सप्टेंबरला राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. (Havaman Andaj)

Onion Rate । सोलापूर बाजारसमिती कांद्याला आज मिळाला सर्वाधीक ‘इतका’ दर; वाचा एका क्लिकवर

नागपूरमध्ये पावसाने घातले थैमान

सध्या नागपूर मध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मध्यरात्री नागपूर मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. अचानक पाऊस सुरू झाला आणि शहरात कहर केला. नागपुरात कधी नव्हे इतका पाऊस झाल्यामुळे अनेक भागात घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्याचबरोबर वाहनांचे देखील नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Papaya Cultivation । ‘या’ पद्धतीने करा पपईची लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न; जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस कोसळणार आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक मराठवाड्यातील, संभाजीनगर, जालना, विदर्भातील बुलढाणा, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Udid Rate । उडदाला आज किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *