Havaman Andaj

Havaman Andaj । सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

हवामान

Havaman Andaj । सध्या देशातील हवामान बदलताना दिसत आहे. उत्तर भारतात थंडीने दार ठोठावले असून गेल्या काही दिवसांपासून थंडी झपाट्याने वाढली आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये हळूहळू तापमानात घट होऊ लागली आहे. मात्र, दक्षिण भारतासह ईशान्येकडील अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. (Havaman Andaj)

Milk Rate | दूध दराबाबत सरकारची महत्त्वपूर्ण बैठक! नेमका काय झाला निर्णय?

वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम 25 नोव्हेंबरपासून उत्तर-पश्चिम आणि पश्चिम भारतावर होणार असून त्यामुळे हवामानात बदल होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या बदलामुळे 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, गुजरात, दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण राजस्थानमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Government Schemes । फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी सरकार देतंय 40 हजारांचे अनुदान, असा घ्या लाभ

महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून महाराष्ट्राच्या दक्षिणकडे असलेल्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Success Story । दुधाला दर नसल्याने शेतकऱ्याने केला स्वतःचा पेढे बनविण्याचा व्यवसाय सुरु; आता अख्ख्या गावाचं दूध घेतो..गावातील डेअरी पडल्या बंद

देशभरातील हवामान कसे असेल?

27 आणि 28 नोव्हेंबर रोजी पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि उत्तर-पश्चिमच्या मैदानी भागात हलक्या पावसाची नोंद केली जाऊ शकते. याशिवाय पुढील दोन ते तीन दिवस दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. या काळात तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, दक्षिण कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, किनारी ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, या काळात पश्चिमेकडील डोंगराळ भागातही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी आणखी वाढणार आहे.

Subsidy for Fodder Seeds । खुशखबर! १०० टक्के मिळणार चारा बियाण्यांसाठी अनुदान, जाणून घ्या अर्जप्रक्रिया

दिल्लीत पुन्हा प्रदूषणाची पातळी वाढणार

दिल्लीतील प्रदूषणाची पातळी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. दिवाळीनंतर दिल्लीतील जनतेला वाढलेल्या प्रदूषणातून काहीसा दिलासा मिळाला, मात्र आता पुन्हा एकदा प्रदूषणाची पातळी अधिकच खालावल्याचे दिसत आहे. बुधवारी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेची स्थिती अत्यंत खराब राहिली.

Electricity Issue । दिलासादायक! वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअॅपवर करता येणार तक्रार, कसं ते जाणून घ्या

बुधवारी शहराचा AQI 394 नोंदवला गेला. तर एक दिवस आधी मंगळवारी तो 365 होता. प्रदूषणासोबतच आता धुक्याचा कहरही दिल्लीत पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण आठवड्यात दिल्लीत धुके दिसून येईल. त्याच वेळी, पर्वतांवर पावसामुळे, मैदानी भागात जोरदार वारे वाहू शकतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *