Havaman Andaj

Havaman Andaj । पुढील 24 तासांत ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज

हवामान

Havaman Andaj । पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे, मात्र असं असलं तरी देखील राज्याच्या काही भागांमध्ये मात्र पाऊस उघडीप देणार असून त्या ठिकाणी उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

हवामान विभागाने वर्तविलेल्या ताज्या अंदाजानुसार, ठाणे आणि पुण्यामध्ये पुढच्या काही तासांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसणार असून वादळी वारे देखील सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर अहमदनगर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जळगाव, लातूर, पालघर आणि रायगडमध्ये देखील पावसाची संतधार सुरू राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत असला तरी अद्यापही काही जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी अजूनही म्हणावा असा पाऊस पडला नाही. त्यामुळे या ठिकाणची पिके पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी देखील चिंचेत आहेत. लवकरात लवकर मुसळधार पाऊस व्हावा अशी अशा आता शेतकऱ्यांना लागली आहे.

देशातील ‘या’ राज्यांना पावसाचा अलर्ट जारी

हवामान खात्याने पुढील 48 तासांसाठी उत्तराखंड मधील सात जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. टिहरी, चंपावत, पिथौरागढ़, पौड़ी, नैनीताल, बागेश्वर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *