Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! मिचॉन्ग चक्रीवादळामुळे ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा

हवामान

Havaman Andaj । डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी या महिन्यात सगळीकडे कडाक्याची थंडी जाणवते. परंतु, यावर्षी याउलट चित्र पाहायला मिळत आहे. यंदा देशासह राज्यात अवकाळी पावसाने (Heavy Rain in Maharashtra) चांगलेच थैमान घातले आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. (Rain Update)

Tur Market । शेतकऱ्यांना तुरीमुळे अच्छे दिन! नवीन तुरीला मिळणार ‘इतका’ भाव

अशातच आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. या महिन्यातही पाऊस (Rain Alert) पडणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.याच लवकरच चक्रीवादळात (Cyclone) रुपांतर होऊ शकते. दरम्यान, १ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत पुद्दुचेरीपासून ६३० किमी पूर्व-दक्षिणपूर्व भागात कमी दाबाचा केंद्रबिंदू तयार झाला असून ही प्रणाली पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकू शकते.

Cultivation of silk । रेशीम लागवडीसाठी मिळतंय पावणे दोन लाखांचं अनुदान, जाणून घ्या योजना

मिचॉन्ग चक्रीवादळाचा धोका

याचा परिणाम राज्यासह देशाच्या तापमानावर होईल. तसेच पुढील १२ तासांत हे चक्रीवादळ खोल दाबाच्या पट्ट्यात रुपांतरित होऊन ३ डिसेंबरपर्यंत नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात याचे ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळात (Cyclone Michong) रूपांतरित होईल,असा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान खात्याने या वादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Success story । गलेगठ्ठ पगारावर पट्ठ्याने मारली लाथ! वाटाणा शेती करून कमावले 5 कोटी; जाणून घ्या कस केलं नियोजन?

चक्रीवादळ ४ डिसेंबरच्या सकाळपर्यंत दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. तसेच ते पुढे उत्तरेकडे सरकू शकते. नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान ५ डिसेंबरच्या दुपारपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. इतकेच नाही तर चक्रीवादळाचा कमाल वेग ताशी ८० ते ९० किमी पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.

Agri startups । तरुणाचा नादच खुळा! 3 वर्षे शेतीत काबाडकष्ट केले अन् आता उभारली 1200 कोटींची कंपनी

या राज्यात आहे पावसाची शक्यता

चक्रीवादळाचे संकट कायम असल्याने दक्षिण आणि पू्व भारतातील अनेक भागात हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, २ डिसेंबर रोजी उत्तर किनारपट्टी तमिळनाडू आणि पद्दुचेरीमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या दरम्यान देशातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ३ डिसेंबरपासून पावसाचा जोर आणखी वाढेल.

Dairy Farming । शेतकऱ्याची अशीही कृतज्ञता, म्हशीच्या मृत्यूनंतर दिल अख्ख्या गावाला जेवण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *