Havaman Andaj । राज्यात आतापर्यंत म्हणावा असा पाऊस पडला नाही. मात्र आता गणपतीचे आगमन होणार आहे त्यामुळे गणपतीच्या आगमनावेळी चांगला मुसळधार पाऊस होईल अशी आशा नागरिकांना लागली आहे. दरम्यान आज शनिवारी राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने आज 16 सप्टेंबरसाठी राज्यातील दहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Havaman Andaj )
Maharastra Rain । धक्कादायक बातमी! पाऊस नसल्याने करमाळ्यातील शेतकऱ्याने पेटवली दोन एकर लिंबाची बाग
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी?
16 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज दहा जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज जारी केला आहे. यामध्ये खानदेशातील नंदुरबार, जळगाव, धुळे त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर विदर्भातील अकोला, नागपूर, वर्धा त्याचबरोबर मुंबईमधील ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि अमरावती विभागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. (maharashtra rain heavy rainfall)
सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये देखील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे हे क्षेत्र आता पूर्व मध्य प्रदेश आणि लगतच्या भागावर आहे. मध्यप्रदेश मधून कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणपर्यंत तयार झाला आहे. त्यामुळे शनिवारी 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.
Kusum Solar Pump Scheme । वीजबिलाची संपली कटकट! कुसुम सौर पंप योजनेत मिळत आहे 90 टक्के अनुदान
देशातील हवामान अंदाज कसा असेल?
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असता हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे. हिमाचलच्या मंडी, चंबा, कांगडा, सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. त्याचबरोबर राज्याच्या मैदानी भागांमध्ये मुसळधार पाऊस तर पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी होण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.