Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! पुढचे तीन दिवस ‘या’ भागाला बसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

हवामान

Havaman Andaj । निम्मा ऑक्टोबर महिना संपला आहे. काही राज्यांमध्ये लोकांना दिवसा उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. परंतु यावर्षी देशासह राज्याला पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. राज्याच्या अनेक भागात अपेक्षित पाऊस पडला नाही. धरणाच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची अपडेट (IMD Update) दिली आहे.

Navratri 2023 । काय आहे शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व? जाणून घ्या

पुढचे तीन दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक जिल्ह्यात पावसाची (Rain in Maharashtra) शक्यता वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस (Maharashtra weather) पडू शकतो. पुढील तीन दिवसानंतर राज्यात उन्हाचा चटका वाढेल. नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतील.

Snakes Farming । ऐकावं ते नवलच भाऊ! येथे सापाचीही करतात शेती, कसं असतं नियोजन? जाणून घ्या

आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकते. या ठिकाणी विजांसह वादळी पाऊस पडेल. तसेच तीन दिवसांनंतर कोकण आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचा परिणाम जास्त जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Pumpkin Farming । बापरे! पाच फुटांचा भोपळा, अशाप्रकारे करा लागवड; मिळेल भरघोस नफा

दरम्यान, देशातील विविध भागात पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात 16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच आज आणि उद्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मंढी आणि शिमला भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Success Story । डाळिंबाच्या शेतीने शेतकऱ्याचे नशीबच बदलले; काही वेळातच झाला मालामाल; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *