Havaman Andaj

Havaman Andaj । चक्रीवादळामुळे देशातील हवामान बदलणार, या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाची माहिती

हवामान

Havaman Andaj । देशातील हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी झपाट्याने वाढली असताना, दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे हवामानात हा बदल दिसून येत आहे. नोव्हेंबरचा अर्धा महिना उलटून गेला तरी देशातील अनेक राज्यांत पाऊस पडत आहे.

Havaman Andaj । 15 ते 25 नोव्हेंबरपर्यंत असे असणार महाराष्ट्राचे हवामान, पंजाबराव डख यांनी वर्तवला नवीन अंदाज

हवामान खात्याने ताजा अंदाज देताना देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. IMD ने सांगितले की, दोन तीव्र चक्रीवादळांमुळे काही उत्तरेकडील आणि उत्तर-पूर्व राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळामुळे देशातील हवामान बदलणार

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल आणि ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरच्या उत्तरेकडील भागात थंडीची लाट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात वादळ निर्माण झाले असून ते देशातील अनेक राज्यांकडे वेगाने सरकत आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीचा समावेश आहे. या वादळाचा वेग ताशी ६५ किलोमीटर असण्याची शक्यता आहे.

Success Story । भारीच! फुलशेतीनं चमकलं शेतकऱ्याचं नशीब, दरमहा कमावतोय 9 लाख रुपये

त्याचबरोबर महासागरातून दुसरे वादळ येत असून त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत उत्तर भारतावर दिसणार आहे. या चक्रीवादळामुळे 17 नोव्हेंबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषत: पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Real Estate । खुशखबर! आता घरबसल्या दिसणार जमिनीचा नकाशा आणि सातबारा उताऱ्यासह रेडीरेकनरचे दर

महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी?

प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यात 15 ते 25 नोव्हेंबरपर्यंत कुठेच पाऊस पडणार नाही असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी आपल्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकाची काढणी सुरु आहे अशा शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.

Fruit crop insurance । बागायतदारांसाठी आनंदाची बातमी! खात्यावर जमा झाली फळपीक विमा परताव्याची रक्कम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *