Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यातील ‘या’ भागामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

हवामान

Havaman Andaj । सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे शेतकरी सुखावला होता. आता मोठा पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र सप्टेंबर महिना सुरू होऊन दोन-तीन दिवस उलटताच पावसाने पुन्हा राज्यभर दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. मात्र आता हवामान विभागाने एक मोठी अपडेट दिली आहे. (Havaman Andaj )

Sandalwood Plantation । करोडोंची कमाई करायची असेल तर आजच करा चंदन लागवड, अशी करा सुरुवात

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर राज्याच्या काही भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Pomegranate cultivation । शेतकऱ्याने करून दाखवलं! डाळिंब लागवडीतून 50 टनाचे उत्पादन घेत कमावले 70 लाख रुपये

हवामान विभागाने उद्या म्हणजे 16 सप्टेंबरला मुंबई, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यभर मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर आज मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे.

Success Story । शिक्षकाने करून दाखवलं! माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; पाहा कसं केलं नियोजन?

दुष्काळ जाहीर करून मदत करावी – शेतकऱ्यांची मागणी

सध्या राज्यभर पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिक वाया जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांची पिके अक्षरशः करपली आहेत, त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Electric motor without light । वीज गेली तरी नो टेन्शन! विजेशिवाय चालते ‘ही’ भन्नाट मोटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *