Havaman Andaj

Havaman Andaj । नागरिकांनो सावधान! ‘या’ भागात हवामान खात्याने दिला जोरदार पावसाचा इशारा

हवामान

Havaman Andaj । ऑगस्ट महिन्यात राज्याकडे पाठ फिरवणाऱ्या मान्सूनने सप्टेंबर महिन्यात चांगले पुनरागमन (Rain in Maharashtra) केले होते. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने (Heavy Rain) चांगलेच थैमान घातले होते. त्यामुळे खरीप पिकांना चांगला दिलासा मिळाला. सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.

Government Scheme । शानदार योजना! आता ‘या’ लोकांना मिळणार कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज

अशातच आता हवामान खात्याने काही भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain in Maharashtra) दिला आहे. दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाला पोषक असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने (IMD Alert) वर्तवला आहे. दक्षिण तामिळनाडू, ईशान्य बांग्लादेश आणि मेघालयमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण आहे.

Wheat Farming । ‘हे’ आहे गव्हाचे उत्तम वाण, पेरणी केल्यास मिळेल भरघोस उत्पादन

दक्षिण कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रामधील नंदूरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Agriculture News । फवारणीसाठी शेतकऱ्याचं अनोखं जुगाड! एक दिवसात 2 व्यक्तींना करता येणार 10 ते 15 एकर फवारणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *