Havaman Andaj । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी सर्वांना सहन करावा लागतो. यंदा राज्यात उशिरा पावसाने हजेरी लावली. त्यात त्याने काही ठिकाणी पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. अशातच ऑक्टोबर महिन्यात देखील पाठ फिरवली. पावसाच्या या लपंडावामुळे नदी, नाले आणि धरणांनी तळ गाठला आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांवर संकट आले आहे.
Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल
निम्मा नोव्हेंबर महिना संपला तरी राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने (Heavy Rain Update) थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी धास्तावले आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पिकांची काढणी सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अशातच आता राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय तापमानात देखील घट झाली आहे.
कमी दाबाचा पट्टा तयार
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस (Rain Alert) पडत आहे. तसेच अरबी समुद्राच्या वायव्य आणि पूर्वमध्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. समुद्राचं बाष्प थेट महाराष्ट्र राज्यावर येत आहे. खास करून दक्षिण महाराष्ट्राच्या बाजूला त्याचा प्रभाव जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. भूगर्भातील पाण्याचं आणि समुद्रातील पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. ऋतूंच्या सीमारेषा नाहीशा होत चालल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना बसत आहे.
४ दिवस बरसणार पाऊस
अशातच राज्यात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यातदेखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटे, अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागातदेखील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
Success Story । ‘या’ सरकारी योजनेनं बदललं ट्रॅक्टर चालकाचे जीवन, बनला राईस मिलचा मालक
त्यामुळेही पश्चिम बंगालच्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकून गुरुवारपर्यंत बंगालच्या उपसागरावर दबाव वाढू शकतो. त्यामुळे अवकाळी पावसाचा जोर वाढेल.