Havaman Andaj

Havaman Andaj । येत्या दोन दिवसात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार परतीचा पाऊस, जाणून घ्या IMD अलर्ट

हवामान

Havaman Andaj । निम्मा ऑक्टोबर महिना संपत आला आहे. काही राज्यांमध्ये लोकांना दिवसा उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. परंतु यावर्षी देशासह राज्याला पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. राज्याच्या अनेक भागात अपेक्षित पाऊस पडला नाही. धरणाच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची अपडेट (IMD Update) दिली आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील 2 दिवसांत ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, IMD ने जारी केला अलर्ट

नागरिकांना आता उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला. लवकरच मान्सून राज्यातून गायब होऊ शकतो. अशातच जाता जाता पाऊस राज्यातील काही भागात कोसळणार (Heavy Rain) आहे. पावसाने मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागांतून विश्रांती घेतली आहे. परंतु, कोकण आणि गोव्यालगत असणाऱ्या काही भागांत पुन्हा एकदा मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) कोसळणार आहे.

Agriculture News । नुकसानग्रस्तांना मिळाला दिलासा! सरकारकडून मिळाले तब्बल 154 कोटी

तसेच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतही काही तास पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. मागील काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. काही जिल्ह्यांत 33 ते 35 अंशांवर दुपारचं तापमान पोहोचले आहे. परंतु, हवामानातील बदलतील थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *