Havaman Andaj । सर्वजण उत्साहात नवीन वर्ष साजरा करताना दिसत आहेत. ठिकठिकाणी पर्यटनस्थळे गजबजली आहेत. परंतु, आज देशाच्या तापमानात घट (Weather Update) होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासूनच देशासह राज्याच्या हवामानात बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ हवामान तर कुठे थंडीचा कडाका वाढत असल्याचे दिसत आहे. (Weather Update Today)
Crorepati Farmer । एका झटक्यात शेतकरी झाला करोडपती, बँक पासबूक अपडेट केलं आणि…
अशातच आता हवामान खात्याने (IMD Weather Forecast) पावसाची शक्यता वर्तवली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (v) देशासह राज्यातील हवामानावर परिणाम होत आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट कायम आहे. येत्या काही दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु, देशाच्या दक्षिणेकडे पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD Alert) वर्तवण्यात आली आहे. (Rain Update)
Success Story । सैन्यात जाता आले नाही म्हणून केली शेती, आज लाखात करतोय कमाई
या ठिकाणी पडणार पाऊस
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात मराठवाडा सोडून कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण असेल. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पाऊस (Rain in Maharashtra) पडेल. मध्य महाराष्ट्रातील 17, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात 1 ते 7 जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.
तसेच आज आणि उद्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाची शक्यता आहे. अनेक राज्यांत तर दाट धुके पडण्याचा इशारा दिला आहे. सध्या देशातील अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी सुरू आहे. पहाटे धुके पडत असल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढेल.
Papaya farming । चर्चा तर होणारच! पपईच्या एका झाडाला लागल्या २०० पेक्षा जास्त पपया
थंडीचा कडाका वाढणार
त्याशिवाय दिल्लीत रविवारी सकाळी 5 अंश सेल्सियस तापमान पाहायला मिळालं होत. दरम्यान, पूर्वेकडून येत असणाऱ्या थंड हवेमुळे थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतात सगळीकडे धुक्याची चादर आहे. उत्तरेकडील भागात थंडीत वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी कायम असेल. थंडी हरभरा, गहू यांसारख्या पिकांसाठी चांगली असेल.
Milk rate । अर्रर्रर्र! दूध दरातून उत्पादनाचा खर्चही निघेना, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट