Havaman Andaj । हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. विभागाने यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन विभागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे, ज्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही जण नदी-नाल्याच्या पूरात वाहून गेले असून, प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे.
Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! 3 एकरातील पपईतून काढले 15 लाखांचे उत्पन्न
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भातील गडचिरोली, अकोला, अमरवती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि नाशिक जिल्ह्यात आज मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागात मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. याशिवाय, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde । शिंदे सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने मागील काही दिवसांत धुमाकूळ घातला असून, त्याचा जोर आता कमी झाला आहे. तथापि, हवामान खात्याने या भागात पुढील काही दिवसांत मोठ्या पावसाचे संकेत दिले आहेत. प्रशासनाने नदी-नाल्यांमध्ये पाणी आल्यास किंवा पूर आल्यास ओलांडण्याचे धाडस न करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री आणि विविध मंत्र्यांनी देखील दौरे केले असून, मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने शेतकऱ्यांना आवश्यक मदत पोहोचविण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे.
या परिस्थितीला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केले असून, याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाच्या आगामी फटकेबाबत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच प्रशासनाच्या सूचना मान्य कराव्यात असे प्रशासनाने म्हटले आहे.