Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! २ दिवस पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; सरकारकडून मदत मिळणार? वाचा बातमी

हवामान

Havaman Andaj । सध्या वातावरणामध्ये मोठे बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Weather Forecast) हिवाळ्यामध्ये देखील पाऊस पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मागच्या दोन दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील अनेक भागांमध्ये पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Agriculture News । ‘हा’ AI चॅटबॉट शेतकऱ्यांचा सोबती, प्रत्येक प्रश्नाचे एका झटक्यात मिळणार उत्तर

मागच्या दोन दिवसांमध्ये मुंबई, छत्रपती संभाजी, नगर, ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला आहे. त्याचबरोबर आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या बदललेल्या वातावरणाचा भाजीपाला पिके कांदा, द्राक्ष तर कोकणातील आंबा, काजू या पिकांना मोठा फटका बसला आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! आजही पावसाची शक्यता, येत्या काही तासात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

ऐन भरात असताना झालेल्या पावसामुळे फळ पिकांचा मोहर गळून पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात देखील द्राक्षासह रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर अजूनही पुढील काही दिवस पाऊस कोसळला तर शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान तयार झाले असून पूरक ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सरकार शेतकऱ्यांना मदत करणार का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

Satbara Utara । सोप्या पद्धतीने मोबाईलवरून काढा 1980 पासूनचे जुने फेरफार व सातबारा उतारे, कसे ते जाणून घ्या

देशभरातील हवामान स्थिती कशी?

हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, पंजाबचा काही भाग आणि उत्तर प्रदेशच्या वेगळ्या भागांमध्ये मध्यम ते तीव्र थंडीची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. 11 रोजी विविध भागांत थंडी कमी होऊन त्यानंतर संपण्याची शक्यता आहे. 11 जानेवारी रोजी राजस्थानच्या विविध भागात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ती कमी होण्याची शक्यता आहे.

Sarkari Yojna । मुलीच्या लग्नाची कटकट संपली! सरकारची ‘ही’ योजना देईल ६४ लाख रुपये

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील 3-4 दिवसांत मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांत किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसची घसरण होण्याची शक्यता आहे. येत्या ५ दिवसांत देशात थंड वारे वाहण्याची शक्यता नाही. 11 आणि 12 जानेवारी 2024 रोजी उत्तराखंडमध्ये जमिनीवर दंव पडण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागात सध्या बर्फवृष्टी दिसत नाही आणि भविष्यातही बर्फवृष्टी होण्याची शक्यता नाही. काश्मीरमध्येही बर्फवृष्टी कमी झाल्याने पर्यटकांची निराशा झाली आहे.

Urea Price । ४५ किलो नाही तर आता मिळणार ४० किलोची युरियाची बॅग, दरात देखील होणार २४ टक्क्यांची वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *