Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! ‘या’ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

हवामान

Havaman Andaj । बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यभर पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडासह पाऊस होणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

Market Price । उडीद, कांदा आणि सोयाबीनला आज बाजारात किती दर मिळाला; जाणून घ्या एका क्लिकवर

आज विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट देखील जारी केला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, जालना, नांदेड तसेच विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Crop Spraying । पिकावर फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का? जाणून घ्या

कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बरसणार आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यभर पावसासाठी पोषक वातावरण तयार असले तरी अजूनही राज्यातील काही जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी अद्यापही म्हणावा असा पाऊस पडला नाही. त्यामुळे त्या ठिकाणचे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. आगामी काळात पाऊस आला नाही तर पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागणार आहे.

Animal care । काँग्रेस गवत खाल्ल्यामुळे जनावरांवर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

धरणांमधील पाणीसाठा कमीच

राज्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही म्हणून राज्यातील जी मोठमोठी धरणे आहे त्या धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी झालेला पाहायला मिळत आहे. एकीकडे ढगाळ वातावरण आणि दुसरीकडे कडक ऊन यामुळे धरणांमधील पाणी झपाट्याने आटत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत अजूनच भर पडली आहे. जर धरणांमध्ये पुरेपूर पाणीसाठा उपलब्ध नसेल तर आगामी काळात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Agriculture News । काजव्यांचे शेतीमध्ये काय योगदान आहे? वाचा सविस्तर माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *