Havaman Andaj । पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने राज्यभर सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र सप्टेंबर महिनाच्या सुरुवातीला दोन दिवस पाऊस कोसळला नंतर पुन्हा एकदा पावसाने दडी मारण्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे बळीराजा सध्या चिंतेत आहे.
Onion Rate । आज कांद्याला किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज कोकणातील ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील हवामान विभागाने जारी केला आहे.
त्याचबरोबर कोकणासह नंदुरबार, पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर राज्यातील उर्वरित ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे.
ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आता शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडत असल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासूनच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या चिंतेत आहेत. नदी, नाले कोरडे आहेत धरणांमधील पाणीसाठावीसन दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात शेतीला पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Udid Rate । बाजार समितीमध्ये उडीदला आज किती बाजार भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर