Havaman adnaj

Havaman adnaj । महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज

हवामान

Havaman adnaj । राज्यातील शेतकरी यंदा निसर्गापुढे हैराण झाले आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (Western Disturbance) प्रभावामुळे देशासह राज्यातील वातावरणात सतत बदल (Change in environment) होताना दिसत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहे. पण या दिवसात देखील राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशातील अनेक भागात पावसाने हजेरी (Rain in Maharashtra) लावली आहे.

Farmers Protest । काय आहे हमीभाव कायदा? ज्यासाठी केले जातेय आंदोलन

मुसळधार पावसासह गारपीटीची शक्यता

अशातच आता हवामान खात्याने (IMD Update) पुन्हा एकदा मुसळधार पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामान खात्याने (IMD Alert) शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. आजही मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची (Heavy rain) शक्यता वर्तवली आहे. (Weather Alert)

Cow Milk Increase Tips । जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ करायची असेल तर कुट्टीमध्ये मिसळा ‘या’ गोष्टी; वाचा महत्त्वाची माहिती

तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी अवकाळीमुळे विदर्भातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अशातच आता हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा अडचणीत सापडला आहे.

Delhi Farmers Protest । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला पाठिंबा

या ठिकाणी पडणार पाऊस

इतकेच नाही तर पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. तमिळनाडूतही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Unseasonal Rain । शेतकऱ्यांना मोठा फटका! अवकाळी पावसामुळे ३८ हजार हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान

दरम्यान, मंगळवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात हलक्या पावसाची नोंद झाली असून पश्चिम बंगाल, तटीय तामिळनाडू, झारखंड, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका पाऊस झाला असल्याने शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याशिवाय नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि आसपासच्या परिसरात हलका पाऊस पडेल.

Success Story । शेतकऱ्याची बातच न्यारी! विषमुक्त स्ट्रॉबेरी शेती पॅटर्न, कमी खर्चात मिळतंय जास्त उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *