Guava Rates

Guava Rates । डाळिंबानंतर पेरुला आले अच्छे दिन, किलोला मिळाला ‘इतका’ दर

सेंद्रीय शेती

Guava Rates । शेतकरी आता आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. यामुळे त्यांना खूप आर्थिक फायदा होत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नियोजन जर योग्य असेल तर उत्पन्न चांगले मिळते. शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. यात अनेकदा काही पिकांना चांगले बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येते.

Heligan Pineapple । ‘हे’ आहे जगातलं तिसरं सर्वाधिक महागडं फळ, किंमत जाणून व्हाल हैराण

दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता. टोमॅटो पाठोपाठ डाळिंबाला अच्छे दिन आले होते. त्यामुळे टोमॅटो आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची चांदी झाली होती. डाळिंबानंतर आता पेरुचे भाव (Guava Price Hike) वाढले आहेत. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकऱ्याच्या पेरूला 60 रुपये प्रतिकिलो दर (Guava Price) मिळाला आहे. मनोजकुमार आगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

Havaman Andaj । नागरिकांनो सावधान! ‘या’ भागात हवामान खात्याने दिला जोरदार पावसाचा इशारा

सेंद्रीय पध्दतीने लागवड

विशेष म्हणजे मनोजकुमार आगे यांनी सेंद्रीय पध्दतीने पेरूची लागवड केली आहे. शिवाय योग्य नियोजन त्यांनी केले होते. त्यामुळे चांगला दर्जा आणि चविष्ट पेरूला बाजारात चांगला भाव मिळाला. त्यामुळे आगे कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे सेंद्रीय फळं हे खूप रसाळ आणि गोड असतात. त्यावर कसलीच प्रक्रिया केली नसते, हे फळ आरोग्यासाठी उत्तम असते.

Government Scheme । शानदार योजना! आता ‘या’ लोकांना मिळणार कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज

अलीकडच्या काळात अनेकांना वेगवेगळे आजार चटकन जडतात. यात कॅन्सरचा जास्त धोका असतो. त्यामुळे हल्ली लोक कोणत्याही रसायनाशिवाय लागवड केलेली फळे, पिके खातात. साहजिकच सेंद्रीय फळ आणि धान्याला चांगला भाव मिळत आहे. परदेशातही त्याची मागणी वाढली आहे. शेतकरीही सेंद्रीय पिकांच्या लागवडीवर भर देत आहेत.

Wheat Farming । ‘हे’ आहे गव्हाचे उत्तम वाण, पेरणी केल्यास मिळेल भरघोस उत्पादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *