Grampanchyat Election

Grampanchyat Election । ग्रामपंचायत निवडणुक लढवायचीय? जाणून घ्या उमेदवारांच्या पात्रता आणि अपात्रता

बातम्या

Grampanchyat Election । जिल्ह्यामध्ये सध्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी (Grampanchyat Election 2023) सुरु झाली असून कालपासून म्हणजेच 16 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांना ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यपदी निवडून येण्यासाठी असणारी पात्रता (Grampanchyat Election Eligibility) आणि अपात्रता याबद्दल कसलीच माहिती नसते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (Grampanchyat Election Disqualification)

Land Rule । तुकडेबंदी कायद्यात बदल! ‘इतक्या’ गुंठ्यांच्या जमीनीची करता येईल खरेदी आणि विक्री

जाणून घ्या पात्रता

  • नामनिर्देशनपत्र सादर करण्याकरिता निश्चित केलेल्या अंतिम मुदतीस त्या व्यक्तीचे वय 21वर्षांपेक्षा कमी नसावे.
  • ग्रामपंचायतीच्या विद्यमान मतदार यादीत त्या व्यक्तीचेच्या नावाचा समावेश असावा.
  • कोणत्याही कायद्याखाली या व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र ठरविले नसावे.
  • 1 जानेवारी, 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींकडे शालेय शिक्षणातील 7 वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे.
  • तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरीत झाल्यास त्या व्यक्तींनी ग्रामपंचायत निवडणुकामध्ये त्या जातीसाठी आरक्षित असणाऱ्या प्रभागातून नामनिर्देशनपत्र दाखल केल्यास त्यांना निवडणूक लढवायला येणार नाही.
  • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार एकापेक्षा जास्त प्रभागामध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकते आणि एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवता येत नाही.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग यांच्याकरीता राखीव असणाऱ्या जागेवरील निवडणूक लढविण्यासाठी संबंधित व्यक्तीने नामनिर्देशनपत्राबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीकडून देण्यात आलेले वैधता प्रमाणपत्र सादर करावे.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग याप्रवर्गातून महिलांसाठी राखीव असणाऱ्या जागांवर त्या त्या प्रवर्गातील महिलेला अर्ज करता येईल.

Property Act । कामाची बातमी! काय असते साठेखत? शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या

जाणून घ्या अपात्रता

  • मुंबई दारूबंदी अधिनियम, 1949 अन्वये दोषी ठरवल्यास आणि त्यानंतर पाच वर्षांचा कालावधी संपला नसल्यास किंवा शासनाने त्यात सवलत दिली नसल्यास त्याला निवडणूक लढवता येणार नाही.
  • समजा एखाद्या व्यक्तीला इतर अपराधाबाबत न्यायालयाने दोषी ठरवल्यास आणि त्याला 6 महिन्यापेक्षा जास्त दिवसासाठी कारावसाची शिक्षा झाल्यास आणि कारावासातून मुक्त झाल्यापासून पाच वर्षांचा कालावधी संपत नसेल किंवा शासनाने त्यात सवलत दिली नसल्यास त्याला निवडणूक लढवता येणार नाही.
  • संबधीत व्यक्तीस राज्य विधानमंडळाने कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र ठरवल्यास त्याला निवडणूक लढवता येणार नाही.
  • एखाद्याला अपराधसिद्धीनंतर जामिनावर सोडल्यास परंतु तिचे अपील निकालात काढण्यासाठी प्रलंबित असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ती व्यक्ती निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरते.
  • शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणतेही पद धारण केल्यास आणि तिला गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यात आले असेल तर त्याला निवडणूक लढविता येत नाही.
  • एखाद्याकडे ग्रामपंचायतीची, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची कोणत्याही प्रकारची थकबाकी देय असल्यास त्याला निवडणूक लढविता येत नाही.
  • जी व्यक्ती पंचायतीच्या नियंत्रणाखाली वेतनीपद किंवा लाभाचे पद धारण करीत असणाऱ्या मुदतीत निवडणूक लढवू शकत नाही.
  • अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त असेल तरी अशी व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही.
  • जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून किंवा पंचायत समितीच्या सदस्याला निवडणूक लढवता येत नाही.
  • आयुक्ताने ग्रामपंचायत सदस्य पदावरून दूर केल्यास अशा रितीने दूर करण्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांचा कालावधी संपल्याशिवाय त्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही.
  • शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केलेल्या व्यक्तीला ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही.
  • निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा हिशेबाच्या मुद्यावरून अपात्र ठरवल्यास त्या व्यक्तीला अपात्रता आदेशाच्या कालावधीत पुन्हा निवडणूक लढवता येत नाही.
  • तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (आय) नुसार शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कर्मचारी असल्यास त्याला निवडणूक लढविता येत नाही.

Fruit Crop Insurance । आनंदाची बातमी! फळ पिक विम्यात केला ‘या’ फळांचा समावेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *