Gram Rate । भारत हा कृषिप्रधान देश असून भारताची जवळपास 70% लोकसंख्या ही शेती आणि शेतीनिगडित व्यवसाय करते. पिकांची लागवड प्रामुख्याने हवामान आणि मातीच्या परिस्थितीवर अवलंबून असून पिकांची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी या हंगामात विभागली जातात. रब्बी हंगामात हरभरा (Gram) हे पीक मोठ्या प्रमाणात घेतात.
Narendra Modi | मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याच्या तयारीत, बड्या नेत्याच्या आरोपामुळे खळबळ
दरम्यान, भारत हा हरभऱ्याचा प्रमुख उत्पादक देश (Gram producing countries) आहे. जगातील एकूण उत्पादनात भारताचा ७०- ७५ टक्क्यांचा वाटा आहे. भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी ४०-५० टक्के हिस्सा हरभऱ्याचा असून हरभऱ्याचा वापर डाळ आणि बेसन या दोन्ही स्वरूपात करतात. त्यामुळे हरभऱ्याला संपूर्ण वर्षभर मागणी (Demand of gram) असते.
काय आहेत सध्याचे हरभऱ्याचे दर?
दरम्यान, नवीन हरभरा विक्री जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू झाली असून सुरुवातीला बाजारपेठेत हरभऱ्याला ६२०० रुपये इतका दर मिळत होता. पण आवक वाढताच हरभऱ्याचा दर (Price of gram) पुन्हा ४०० रुपयांनी उतरला आहे. अशातच आता ५८०० रुपये दराने हरभऱ्याची खरेदी सुरू झालेली आहे. (Market price of gram)
Tur Market । तुरीला सध्या किती बाजारभाव मिळतोय? शेतकरी मित्रांनो वाचा एका क्लिकवर
यंदा सुरुवातीला हरभऱ्याला ६२०० रुपये इतका दर मिळत होता. पण त्यानंतर हरभऱ्याची आवक वाढताच चारशे रुपयांनी घट झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या पाच हजार ८०० रुपये या भावाने हरभरा खरेदी केला जात असून सध्या हरभऱ्याला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी हरभरा बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहे.