Governmnet Schemes

Governmnet Schemes । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बांबू लागवडीसाठी मिळणार हेक्टरी 7 लाखांचं अनुदान

शासकीय योजना

Governmnet Schemes । खरंतर शेतकऱ्यांना सतत विविध संकटांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नांवरही होत असतो. नैसर्गिक लहरीपणामुळे पिकांचे खुप नुकसान होते, शेतकरी अनेकदा या संकटांमुळे खचून जातात. त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना अंमलात आणते. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो.

Grain Dryer । मस्तच! बाजारात आले स्वस्त धान्य वाळवणी यंत्र, किंमत आहे फक्त ‘इतकीच’

शेतीत नवनवीन प्रयोग शेतकरीवर्ग करत आहेत. ज्याचा त्यांना फायदा होतो. शेतकरी आता पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पिकांची लागवड करत आहेत. काही शेतकरी पर्यावरणाच्या फायदेशीर असणारी बांबूची लागवड (Bamboo Cultivation) करत आहेत. सध्या वाढलेल्या तापमानामुळे आणि हवेतील कार्बनच्या प्रमाणामुळे जीवसृष्टी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Bamboo Cultivation Information)

Milk Price । राज्यात दुधाचे दर का कमी होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

बांबू लागवड योजना

वातावरणातील कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी बांबूची लागवड (Bamboo Plantation Scheme) करण्यात येते. परंतु, अनेकांकडे लागवडीसाठी आवश्यक तेवढे पैसे नसतात. आता सरकार बांबू लागवडीसाठी अनुदान (Bamboo Cultivation Subsidy) उपलब्ध करून देत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने देखील बांबू लागवड फायद्याची आहे. शिवाय अल्पभूधारक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड खूप फायदेशीर आहे.

Agriculture Subsidy । विहिरीसाठी मिळतंय चार लाख रुपये अनुदान; लगेचच करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

मिळेल अनुदान

वास्तविक अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या या योजनेमध्ये बांबू रोप लागवडीसाठी प्रतिहेक्टर ७ लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. समजा त्यांनी पाण्यासाठी विहीर पाडली तर त्यावर त्यांना अनुदान म्हणून ४ लाख रुपये जास्त मिळतील. साहजिकच बांबूच्या विक्रीतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.. ‘मनरेगा’अंतर्गत राज्यात होणारी ही बांबू लागवड योजना फायद्याची ठरेल.

Havaman Andaj । ‘या’ राज्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल, मिचॉन्ग चक्रीवादळाचं संकट; 5 डिसेंबरला धडकणार

दरम्यान, बांबूचे पिक मातीचे आरोग्य वाढविणारे असून दिवसेंदिवस रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहि. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. परंतु आता बांबू लागवडीमुळे या समस्या कमी होतील. पर्यावरण संरक्षणाबरोबरच या योजनेमुळे अनेक सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होईल.

Eucalyptus Farming । ‘या’ एका झाडाची लागवड केल्यास शेतकरी होईल मालामाल; खर्च कमी आणि लाखोंचा नफा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *