Government Subsidy । शेतीत आता नवनवीन बदल होऊ लागले आहेत. पूर्वी शेतीच्या कामांसाठी मजुरांचा वापर केला जायचा. परंतु आता मजुरांची जागा कृषी यंत्रांनी घेतली आहे. बाजारात अनेक कृषी यंत्र उपलब्ध आहेत, ज्यामुळे शेतीशी निगडित असणारी कामे चुटकीसरशी होऊ लागली आहेत. कृषी यंत्रांमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे. पेरणीपासून ते मळणीपर्यंत यंत्रे बाजारात मिळतात.
Success Story । दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेतकऱ्याची कमाल! पपईतून घेतले विक्रमी उत्पादन
काही यंत्रांच्या किमती शेतकऱ्यांच्या बजेटबाहेर असतात. त्यामुळे त्यांना ती यंत्रे इच्छा असूनही खरेदी करता येत नाहीत. परंतु काळजी करू नका. तुम्हाला ही यंत्रे खरेदी करता येतील. सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन योजना (Government Schemes) राबवत आहेत. याच योजनांच्या मदतीने तुम्हाला कृषी यंत्रे (Subsidy Agricultural Machinery) खरेदी करता येतील. सरकार आता कृषी यंत्रांवर 50 टक्के अनुदान (Subsidy on Agricultural Machinery) देत आहे. जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.
Wheat Farming । शेतकऱ्यांनो, गव्हाच्या पिकाला किती दिवसांनी पाणी द्यावे? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला
या यंत्रांवर मिळेल अनुदान
सोप्या पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकरी पारंपरिक पद्धतींऐवजी आधुनिक पद्धतींचा वापर करत आहेत. शेतकरी कमी कष्टाने जास्त नफा कमवत आहेत. शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या अनेक यंत्रांमुळे शेती करणे खूप सोपे होते.काही कृषी यंत्रांच्या किंमती जास्त असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना ते खरेदी करता येत नाहीत. काही यंत्रे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, उत्तर प्रदेश सरकार डिस्क नांगर, बटाटा खोदण्याचे यंत्र, नांगर, ट्रॅक्टर माउंट स्प्रेअर, पॉवर थ्रेशर आणि क्लीटवॉटर यासह इतर अनेक कृषी यंत्रांवर ( Agricultural Machinery) 50 टक्के पर्यंत अनुदान देत आहे.
आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुमच्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे असावी लागतात. अर्जदाराकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असावे लागते. समजा तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर तुम्हाला या 50 टक्के अनुदान योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्याने कोणतेही कृषी यंत्रे खरेदी केली असल्यास त्याचे बिल त्याच्याकडे असावे लागते. त्याशिवाय शेतकऱ्याकडे जमिनीची कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि बँक खाते असावे लागते.
असा करा अर्ज
सर्वात अगोदर तुम्हाला उत्तर प्रदेश सरकारच्या कृषी विभागाच्या http://upagriculture.com/ वेबसाइटवर जावे लागणार आहे. पुढे तुम्हाला कृषी यंत्रासाठी बुकिंग आणि जनरेटिंग टोकनवर क्लिक करावे लागणार आहे. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर एक OTP देखील येईल. ते पूर्णपणे भरून पुढील बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला येथे शेतकरी नोंदणी क्रमांक भरावा लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.