Government Schemes

Government Schemes । ‘या’ लोकांची दिवाळी होणार गोड! मिळणार 4,500 रुपयांचा आर्थिक लाभ

शासकीय योजना

Government Schemes । केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. परंतु अनेकांना योजनांबद्दल माहिती नसल्याने त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. वयोवृद्ध व्यक्ती, महिला, विद्यार्थी, शेतकरी, दिव्यांग यांच्यासाठी सरकार सतत योजना राबवत असते. सरकारची अशीच एक योजना आहे, ज्या अंतर्गत 4,500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळत आहे.

Success Story । शेतकऱ्याची बातच न्यारी! कॅन्सरग्रस्त पुणेकराने केली केशराची यशस्वी शेती, वर्षाला मिळतेय लाखोंचे उत्पन्न

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांसारख्या योजना निराधार लोकांसाठी राबवल्या जातात. या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्यांना आता दिवाळीपूर्वी 4500 रुपये मिळणार आहेत. या सर्व योजनेअंतर्गत आधी निराधार लोकांना प्रति महिना 1,000 रुपये अनुदान दिले जात होते. काही महिन्यांपूर्वी सरकारने अनुदानात 500 रुपयांची वाढ केली आहे.

Namo Shettale Abhiyan । पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राबवली जाणार नवीन योजना, शेततळ्यासाठी मिळणार पैसे

माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या अनुदानासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सणासुदीच्या काळात खूप मोठा दिलासा मिळेल, यात काही शंकाच नाही. सरकारच्या या निर्णयामुळे संबंधित निराधार लोकांची दिवाळी गोड होईल. सरकारकडून या योजनेच्या निधीची उपलब्धता झाली नव्हती, त्यामुळे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना मिळत नव्हती.

Sharad Pawar । मोठी बातमी! दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

मिळणार 3 महिन्यांचे अनुदान

परंतु, सरकारने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांची अनुदानाची रक्कम देण्यासाठी आदेश काढले आहेत. दिवाळीपूर्वी अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तहसील मध्ये नोंद असणाऱ्या या योजनेच्या 7565 निराधार लाभार्थ्यांना रक्कम मिळेल.

Havaman Andaj । राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *