Government Schemes। शेतकऱ्यांना अनेक अडचणींवर मात करत शेती करावी लागते. त्यातून दरवर्षी शेतमालाला योग्य हमीभाव मिळेलच असे नाही. अनेकदा शेतमालाला हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना हतबल व्हावे लागते. काही जण आर्थिक संकट आल्याने निराश होऊन टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने विविध योजनांना सुरुवात केली आहे.
Agriculture Well । सरकारी योजनेअंतर्गत राज्यात पाच वर्षांत दहा लाख सिंचन विहरींचे उद्दिष्ट
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
त्यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana) होय. देशभरातील करोडो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. जर शेतकऱ्यांनी या योजनेत (PM Kisan Mandhan Yojana) गुंतवणूक केली तर शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, तुम्हाला काही गोष्टींची माहिती असावी लागते. (PM Kisan Mandhan Yojana Investment)
Government schemes । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे अनुदान
जाणून घ्या नियम आणि अटी
या योजनेसाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करून गुंतवणूक सुरू करू शकतात. हे लक्षात ठेवा की तुम्ही या योजनेसाठी ज्या वयात अर्ज करता, त्या वयाच्या आधारे गुंतवणुकीची रक्कम ठरवण्यात येते. गुंतवणुकीची रक्कम 55 ते 200 रुपयांपर्यंत निश्चित केली आहे. समजा शेतकऱ्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला तर त्याला दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल.
Milk production । ‘या’ देशात केले जाते सर्वात जास्त दूध उत्पादन; वाचा बातमी
गुंतवणूक करणारा शेतकरी 60 वर्षांचा होईल तेव्हा त्याला प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये पेन्शनच्या स्वरूपात मिळतात. शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीला प्रत्येक महिन्याला 50 टक्के पेन्शन मिळते. तसेच शेतकरी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये पेन्शन मिळते.
Desi Ber । गावरान बोरांनी गाठला उच्चांक, प्रतिक्विंटल मिळतोय १००० ते २००० रुपयांचा दर
आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला देखील पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अधिकृत साइटला भेट देऊन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र, वय प्रमाणपत्र असावे लागते.