Government schemes

Government schemes । महिलांनो, उद्योजक बनायचंय? आता सरकारच करतंय मदत, जाणून घ्या योजना

शासकीय योजना

Government schemes । असे कोणतेच क्षेत्र नाही, ज्यात महिला पिछाडीवर आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यांच्यासाठी कोणतेच क्षेत्र नवीन नाही. अशातच आता जर तुम्हाला उद्योजक बनायचं व्हायचं असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. (Government schemes for women)

Melon Cultivation । शेतकरी बांधवांनो, खरबुजाची लागवड करून तीन महिन्यात मिळवा लाखो रुपये

कारण सरकारची महिलांसाठी खास योजना (Special scheme for women) आहे, या योजनेअंतर्गत महिलांना उद्योजक बनता येईल. आता महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढावा, तसेच महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून आई हे महिला केंद्रित धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणांतर्गतच महिला उद्योजकांसाठी नवीन कर्ज योजना (Loan scheme) सुरू केली आहे.

Jayakwadi Dam । शेतकऱ्यांना मोठा फटका! पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही

पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजकांनी देखील सरकारच्या या खास योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. पर्यटन हे असे क्षेत्र आहे ज्याची सतत वाढ होत आहे. ज्या महिलांना उद्योजक बनायचंय आहे, त्यांच्यासाठी सरकारची ही खास योजना आहे. लवकरात लवकर सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! 2 एकरातून मिळवलं तब्बल 75 लाखांचं उत्पन्न, जाणून घ्या यशोगाथा

कोणाला करता येणार अर्ज

पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत व्यवसाय असेल तर महिला उद्योजकांना या योजनेसाठी अर्ज करता येईल. पर्यटन व्यवसायामध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय आणि इतर कर्मचारी महिला असाव्या. त्यांच्याकडे पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या आणि त्यांनी चालविलेल्या पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसायाकरीता मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याज परतावा मिळेल.

Unseasonal Rain । राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मंजूर झाले 2109 कोटी रुपये

या योजनेसाठी व्याजाची रक्कम १२ टक्क्याच्या मर्यादेत त्यांच्या खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम ४.५ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत असावे. हे लक्षात घ्या की, या तीन पर्यायांपैकी जे अगोदर होईल तोपर्यंत व्याजाचा परतावा म्हणून मिळेल.

Farmers Producer Organization । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जैविक निविष्ठा केंद्र सुरु करून मिळवा 1 लाख रुपये

या ठिकाणी साधा संपर्क

तुम्ही जास्त माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर किंवा मुख्यालय – ०२२ ६९१०७६०० क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा पर्यटन अधिकारी यांच्याशी देखील संपर्क साधू शकता.

Success Story । डाळमिलने बदलले महिलेचे आयुष्य; वाचा यशोगाथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *