Government schemes । शेतकऱ्यांना अनेक अडचणींवर मात करत शेती करावी लागते. त्यातून दरवर्षी शेतमालाला योग्य हमीभाव (Agricultural prices) मिळेलच असे नाही. अनेकदा शेतमालाला हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना हतबल व्हावे लागते. काही जण आर्थिक संकट आल्याने निराश होऊन टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने विविध योजनांना (Agri schemes) सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Milk production । ‘या’ देशात केले जाते सर्वात जास्त दूध उत्पादन; वाचा बातमी
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार ५० हजारांचे अनुदान
सध्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत. ज्याचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ७० आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी ५० हजारांचे अनुदान मिळणार आहे. या अनुदानातून शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदी करता येईल. अनुदानाचा लाभ काहींना मिळाला आहे तर उरलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.
Desi Ber । गावरान बोरांनी गाठला उच्चांक, प्रतिक्विंटल मिळतोय १००० ते २००० रुपयांचा दर
दरम्यान, सन २०१७-१८ पासून जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सेस फंडामधून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ५० हजारांची मदत देण्यात येते. सन २०२२-२३ पर्यंत अहमदनगर मधील १३७ कुटुंबांना मदत दिली आहे. तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात १० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी पाच लाखांची तरतूद जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली.
तसेच ६४ कुटुंब नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रतीक्षा यादीत आहेत. लवकरच त्यांना देखील मदत देण्यात येणार आहे. कृषी विभागाने हवामान केंद्र स्थापन करण्याचा १५ लाखांचा निधी शेतकऱ्यांसाठी वळवला आहे. त्यामुळे यातील एकूण ३० कुटुंब मदतीच्या कक्षेत आले आहेत. आता यामध्ये एकूण ३४ कुटुंबे उरली आहेत. त्या कुटुंबांना मदत देण्यासाठी अतिरिक्त तरतूद केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून मिळाली आहे.
Maize Import । आता भारतात येणार म्यानमारची मका, आयातीसाठी सरकारच्या हालचाली सुरु
५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी
पशुसंगोपनसाठी कडबाकुट्टीची गरज असते. त्यामुळे ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी देण्याची योजना कृषी विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. यातून यंदाच्या आर्थिक वर्षी ३३३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यासाठी सेस फंडमधून ३० लाखांची तरतूद जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे.
Havaman Andaj । पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचे अपडेट