Government Schemes । शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो. या संकटांमुळे त्यांचे सतत आर्थिक नुकसान होते. आर्थिक संकटांमुळे अनेक शेतकरी कर्ज घेतात आणि कर्जाची परतफेड न झाल्याने ते टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना (Schemes) राबवत असतात. ज्याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो.
Onion Price । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! दुपटीने वाढल्या कांद्याच्या किमती
आता मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजनेच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. याच योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळे (Magel Tyala Shettale Yojana) मिळते. दुःखद बाब म्हणजे अनेक शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नाही. त्यामुळे त्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येत नाही. जाणून घेऊयात सरकारच्या या योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि पात्रता काय आहे. (Magel Tyala Shettale Yojana Application)
असा करा अर्ज
- तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन वैयक्तिक शेततळे हा पर्याय निवडून अर्ज करावा लागेल.
- लॉग इन केल्यानंतर सगळ्यात अगोदर सिंचन, साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.
- वैयक्तिक शेततळे या बाबींची निवड करा.
- इनलेट व आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेट शिवाय यापैकी एक पर्याय निवडा.
- शेततळ्याचे आकारमान व स्लोपची निवड करा.
जाणून घ्या पात्रता
- शेतकऱ्याच्या नावावर 0.6 हेक्टर जमिन असावी.
- लाभार्थी शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळे किंवा सामायिक शेततळे अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर किंवा पूर्ण होत आल्यानंतर सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करावी.
- जेवढ्या आकाराच्या शेततळ्याला मंजुरी मिळाली असेल तेवढ्या आकाराचे शेततळे खोदणे बंधनकारक आहे.
- कृषी विभागाच्या माध्यमातून शेततळे तपासणीसाठी कर्मचारी आल्यानंतर ज्या ठिकाणची जागा निश्चित केली असेल त्याच ठिकाणी शेततळे खोदावे.
- तसेच योजनेकरिता लॉटरी लागल्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या आदेशानुसार पुढील तीन महिन्यात काम पूर्ण करावे लागणार आहे.
Animal Husbandry | गायी आणि म्हैशींचे दूध वाढवण्यासाठी करा ‘हे’ नैसर्गिक उपाय! होईल फायदा
योजनेचे स्वरूप
तुम्हाला आता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 अंतर्गत सामूहिक शेततळ्याकरिता व राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक क्षेत्रासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. तुम्ही आता देखील अर्ज करू शकता, कारण सध्या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना किंवा शेतकरी कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली असल्यास त्यांच्या वारसांना प्राधान्य मिळते. तसेच इतर सर्व प्रवर्गातील शेततळ्यांची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड त्यांच्या ज्येष्ठता यादीनुसार पहिले येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार निवड केली जाते.
Lemongrass tea | खर्च कमी पण उत्पन्न जास्त! लाखो रुपयांचे उत्पन्न देणारे ‘हे’ पीक घेऊन बघाच
आवश्यक कागदपत्रे
बँकेचे पासबुक व मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, जमिनीचा सातबारा आणि आठ अ चा उतारा, लाभार्थी इतर प्रवर्गातील असेल तर जात प्रमाणपत्र, शेततळ्याकरिता खरेदी करण्याचे साधन किंवा उपकरणांचे कोटेशन, मान्यता प्राप्त कंपनीचा टेस्टिंग रिपोर्ट( पंप या घटकाकरिता आवश्यक),हमीपत्र तसेच पूर्व संमती पत्र व शेतकरी करारनामा इत्यादी कागदपत्रे लागतील.
Onion Rates | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदा ‘शंभरी’ गाठणार