Government course । आज तुम्ही गाव, तालुका पातळीवर कृषी सेवा केंद्रांची दुकानं पाहत असाल.खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री या कृषी सेवा केंद्रांमधून (Agricultural Service Centers) करता येते. परंतु त्यासाठी कृषी विभागाकडून परवाना घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमचे शिक्षण पूर्ण असावे लागते. जर तुम्ही अटींची पूर्तता करू शकला तर तुम्हाला परवाना मिळेल. नाहीतर तुम्हाला परवाना मिळणार नाही.
कृषी पदविका तसंच कृषी विज्ञान विषयात पदवी असावी लागते. जर तुमच्याकडे पदवी नसेल आणि तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार सतत विविध योजना (Government new course) राबवत असते. ज्याचा लाभ देशातील करोडो नागरिक घेत असतात. सरकार आता रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचा फायदा बेरोजगारांना होणार आहे.
दहावी उत्तीर्ण तरुणांना सुवर्णसंधी
दरम्यान, आता कृषी पदवी घेतलेल्या तरुणांसोबतच दहावी उत्तीर्ण तरुणांना देखील या उपक्रमाच्या माध्यमातून खत-बियाणे व्यवसाय (Fertilizers and seeds business) करता येणार आहे. यासाठी सरकारने 15 दिवसांचा कोर्स केला असून तरुणांना तो कोर्स पूर्ण केल्यानंतर खत आणि बियाणांच्या संदर्भातील व्यवसाय करता येईल. महत्त्वाचे म्हणजे खत आणि बियाणे व्यवसाय परवाना मिळवण्यासाठी नियम बदलले आहेत.
सरकारने दिली माहिती
याबाबत केंद्र सरकारने माहिती दिली आहे. तुम्हाला व्यावसायिक पात्रता प्राप्त करण्यासाठी खत-बियाणे केंद्रामध्ये 12 हजार 500 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. हे लक्षात घ्या की हा अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय परवाना मिळणार नाही. सरकारच्या नवीन नियमामुळे शेतकर्यांशिवाय उद्योगधंद्यांना नवीन संधी मिळतील.
Corn Crop Management । मका लागवड करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, मिळेल भरघोस उत्पादन
15 दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
तरुणांना कृषी विज्ञान केंद्रात 15 दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसावे लागणार आहे. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना परवान्यासाठी अर्ज करता येईल. परंतु, तुमच्या कृषी सेवा केंद्रातून बेकायदेशीररित्या खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करत असल्याचं स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना समजले आणि तुम्हाला जिल्हा कृषी अधीक्षकांनी दोषी ठरवल्यास तुमचा परवाना रद्द होईल.
Organic Vegetables । मस्तच! आता सेंद्रिय भाजीपाला पिकवून मिळवा सरकारी अनुदान, असा घ्या लाभ