Goat farming । भारताकडे कृषिप्रधान देश म्हणून पाहिले जाते. देशात ऊस, गहू, कापूस, मका, ज्वारी यांसह अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. परंतु अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवरच चालत नाही. त्यामुळे ते शेतीसोबत एखादा जोडव्यवसाय करतात. यामध्ये शेळीपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. हा असा व्यवसाय आहे जो कमी जागेतही करता येतो.
विशेष म्हणजे बाजारात शेळीचे दूध आणि मांसाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या व्यवसायातून अलीकडच्या काळात चांगली कमाई होत आहे. त्यामुळे अगदी सुशिक्षित लोकही नोकरी सोडून शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे कमी असतील तर काळजी करू नका आता तुम्हाला सरकारी मदत मिळेल.
किती मिळेल अनुदान?
केंद्र सरकार पशुपालनावर 35% पर्यंत अनुदान देते. तर शेळीपालन करण्यासाठी तुम्हाला बँकांकडून तसेच नाबार्डकडून कर्ज मिळू शकेल. त्यांची मदत घेऊन तुम्ही शेळीपालनाचा व्यवसाय सुरु करून बंपर कमाई करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. तुम्ही बंदिस्त आणि खुल्या प्रकारात शेळीपालन करू शकता.
चारा
शेळ्यांच्या आहारात हिरवा चारा खूप महत्वाचा असतो. परंतु, संपूर्ण वर्षभर हिरवा चारा मिळतोच असे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खैर, बाभूळ, सुबाभूळ, वेडीबाभूळ, शेवगा यांसारख्या झाडापाल्याचा आधार घ्यावा लागतो. तसेच तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी पशुवैद्यकीय मदत, निर्यात क्षमता, बाजारपेठेची संपूर्ण माहिती असावी.
लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायचं असेल तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, शेळ्यांच्या विविध जातींसाठी स्वतंत्र कक्ष असावे. शेळ्यांच्या जातीची निवड काळजीपूर्वक करावी. तसेच शेळ्यांचे उत्तम संगोपन करण्यासाठी शेळ्यांच्या आहार व्यवस्थापनाची विशेष काळजी घ्यावी.