Fruit processing industry

Fruit processing industry । लगेचच सुरु करा फळप्रक्रिया उद्योग, सरकार देतंय १० लाखांपर्यंत अनुदान

शासकीय योजना

Fruit processing industry । अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यामुळे अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय करतात. तुम्ही फळप्रक्रिया उद्योग सुरु करू शकता. सरकार वेळोवेळी सर्वसामान्यांच्या हितासाठी कल्याणकारी योजना (Government Schemes) सुरु करत असते. केंद्र सरकारने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Prime Minister’s Micro Food Processing Industries Scheme) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १० लाखांपर्यंत अनुदान मिळत आहे.

Cotton prices । कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त मिळणार दर

आता तुम्ही फक्त टोमॅटोच नाही तर केळी, डाळिंब किंवा कोणतेही फळ किंवा पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करू शकता. जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तुम्ही https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/ या संकेतस्थळावर भेट देऊ शकता. कृषी विभागाकडून योजना राबवण्यात येत आहे.

Cow Poisoning । धक्कादायक! विषबाधेतून तब्बल २० गायींचा मृत्यू, व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

जाणून घ्या पात्रता

शेतकरी उद्योजक होण्यास इच्छुक असतील, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. इतकेच नाही तर गट लाभार्थी, वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, बेरोजगार युवक इत्यादी व्यक्तींदेखील योजनेअंतर्गत अर्ज करता येतो.

Satbara Utara । सातबारा देखील असतो बोगस! ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि ओळखा बनावट सातबारा

जाणून घ्या नियम आणि अटी

  • अर्जदाराचे कमीत कमी वय १८ वर्ष पूर्ण असावे.
  • अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असावा.
  • एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार आहे, हे लक्षात ठेवा.
  • अर्जदाराची पात्र प्रकल्प किमतीच्या कमीत कमी दहा टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची आणि उरलेली बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी लागते.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! एक एकर लाल मिरचीतून मिळाले ३ लाखाचे उत्पन्न; कसं केलं नियोजन?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *