Drought in Maharashtra । दुष्काळाची अशी ही दाहकता! चोरट्यांनी मारला चाऱ्यावर डल्ला

बातम्या
Drought in Maharashtra

Drought in Maharashtra । राज्याच्या अनेक भागात यंदा पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली. पावसाविना अनेक पिके जळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट आले. ऐन पावसाळ्याच्या दिवसातच पावसाने पाठ फिरवल्याने यंदा सगळीकडे दुष्काळ सदृश (Drought) स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चाऱ्याच्या किमती खूप महाग झाल्या असल्याने पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Land Rule । आनंदाची बातमी! तुकडेबंदी कायद्यातील बदलामुळे १ ते ५ गुंठे जमिनीची करता येणार खरेदी-विक्री

चोरट्यांनी मारला चाऱ्यावर डल्ला

अशातच राज्यात चक्क चारा चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. यावरून दुष्काळाची दाहकता लक्षात येत आहे. हिंगोली येथील शासकीय पशू पैदास प्रक्षेत्राच्या १०१ हेक्टर शेतजमिनीवर कापून ठेवलेला ज्वारीचा कडबा चोरीला गेला (Fodder was stolen) आहे. ही घटना हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारात २५ मार्च रोजी सकाळी सकाळी ७:३० वाजता समोर आली असून याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Success Story । पाटलांचा नादच खुळा! खडकाळ जमिनीत काढले तब्बल १२० टन उसाचे उत्पादन

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बासंबा आणि पिंपरखेड शिवारातील गट क्र. १९९ मध्ये शासकीय पशू पैदास प्रक्षेत्र कार्यालयाची १०१ हेक्टर शेतजमीन असून येथे पशुखाद्य म्हणून चारा पीक घेण्यात येते. २४ मार्च रोजी बासंबा शिवारातील तब्बल ६ एकरवरील चारा कापून शेतात पेंड्या बांधून ठेवला होता.

Onion Market । कांदा बाजार समितीतील धक्कादायक प्रकार! शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने दिलेले लाखोंचे चेक झाले बाउन्स

दरम्यान, मुकादमाने २५ मार्च रोजी शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना कापून ठेवलेला ३० हजार रुपये किमतीच्या ७ टन ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्या चोरून नेल्याचे समजले. याप्रकरणी प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. बाळासाहेब डाखोरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पण या घटनेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Baramti News । महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेतली सामिंद्राताई सावंत यांच्या देशी बियाणे बीज बँकेची दखल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *