Fennel Cultivation । शेतकऱ्याची बातच न्यारी! पहिल्यांदाच श्रीगोंदा दरवळला बडीशेपच्या सुगंधानं

यशोगाथा
Fennel Cultivation

Fennel Cultivation । पूर्वी शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने शेती (Traditional farming) केल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. पण आता शेतकरी शेतीत विविध प्रयोग करू लागले आहेत. यामुळे उत्पन्नात वाढही होत आहे आणि शेतकऱ्याची सर्वत्र चर्चादेखील होते. राज्यात सध्या श्रीगोंद्याची चर्चा होऊ लागली आहे. कारण श्रीगोंद्याच्या आढळगाव येथील एका शेतकऱ्याने कमाल केली आहे.

Cow Dung Rate । पशुपालकांची चांदी! सर्वाधिक दरानं विकलं जातंय शेणखत

तीन महिन्यात हजारोंच उत्पन्न

बडीशेपचे (Fennel) पीक गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशच्या काही भागात पिकवले जाते. पण या पिकाचा (Fennel crop) श्रीगोंद्याच्या आढळगावमध्ये प्रयोग करण्यात आला आहे. आढळगाव येथील अजय काळे, गणेश काळे आणि देऊळगाव येथील शेतकरी दत्ता दांगडे यांनी प्रायोगिक तत्त्वावर बडीशेपचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांना दहा गुंठे क्षेत्रात अवघ्या तीन महिन्यांत प्रत्येकी ५० ते ६० हजारांचे उत्पन्नही मिळाले आहे. (Cultivation of Fennel)

Hailstorm । शेतकऱ्यांना गारपिटीचा मोठा फटका! तब्बल २० कोटीचे झाले नुकसान

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी सुरू केला आहे. त्यामुळे तालुक्यात बडीशेप लागवड वाढेल. कृषी विद्यापीठ आणि शेतकरी पिकाचा पॅटर्न बदलू लागले असून यातूनच शेतकऱ्यांना मंगलम शरयू सीड्सच्या वोलिना वाणाचे बडीशेप पीक राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेण्याचा सल्ला देण्यात आला.

Onion Storage । शेतकऱ्यांनो, कांदा चाळीत साठवायचा असेल तर ही योजना येईल तुमच्या कामी

कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार अजय काळे, गणेश काळे आणि दत्ता दांगडे यांनी प्रायोगिक तत्त्वावर हे पीक घेतले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रयोग यशस्वी देखील झाला. बडिशपेच्या पेरणीसाठी एकरी आठशे ग्रॅम बडीशेप लागते. त्यातून ७ ते ८ क्विंटलचे बडीशेपचे उत्पन्न निघते. बडीशेपला सरासरी प्रतिक्विंटल ३० ते ५५ हजार रुपयांप्रमाणे दर मिळतो.

Onion Market । मोठी बातमी! बाजार समित्या नाही तर शेतकरी संघटना सुरू करणार कांद्याचे लिलाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *