Paddy Compensation । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार २५ लाख रुपये

बातम्या
Paddy Compensation

Paddy Compensation । राज्यातील अनेक शेतकऱ्यांना यंदा खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली तर नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. (Rain in Maharashtra) अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आता २५ लाख रुपये येणार आहेत.

Drought In Maharashtra । दुष्काळाची अशी ही दाहकता! चोरट्यांनी मारला चाऱ्यावर डल्ला

मुळशी तालुक्यातील एकूण ५५० शेतकऱ्यांना भात पिकाच्या नुकसान भरपाई मिळणार आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल पंचवीस लाख रुपये मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना बॅंक खात्याचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar authentication) करणे गरजेचे आहे.

Land Rule । आनंदाची बातमी! तुकडेबंदी कायद्यातील बदलामुळे १ ते ५ गुंठे जमिनीची करता येणार खरेदी-विक्री

दरम्यान, तालुक्यात नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने १४१ हेक्टर क्षेत्रावर असणाऱ्या भाताच्या पिकांचे नुकसान (Paddy crop damage) झाले होते. याचे तहसीलदार रणजित भोसले, तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांच्या मार्गदर्शनातून महसूल विभाग, कृषी विभाग यांच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी पंचनामे केले होते.

Success Story । पाटलांचा नादच खुळा! खडकाळ जमिनीत काढले तब्बल १२० टन उसाचे उत्पादन

असणार या अटी

यासाठी काही नियम अटी ठेवण्यात आल्या आहेत. बॅंक खात्याला आधार कार्ड क्रमांक संलग्न असल्यास आधार प्रमाणीकरण करताना लगेचच शेतकऱ्यांच्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. हा ओटीपी आधार प्रमाणीकरण करताना दिल्यास आधार प्रमाणीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यानंतर हे पैसे बॅंक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील. शेतकऱ्यांनी यासाठी जवळील महा-ई सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्रांवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

Onion Market । कांदा बाजार समितीतील धक्कादायक प्रकार! शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने दिलेले लाखोंचे चेक झाले बाउन्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *