Farmers Suicide । काम कोणतेही असो त्यात संकटे येतात. भारतात मोठ्या प्रमाणावर शेती (Agriculture) केली जाते. शेती करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी कधी निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. तर कधी शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळत नाही. यांसारख्या अनेक संकटांमुळे काही शेतकरी हतबल होऊन टोकाचा निर्णय घेतात.
धक्कादायक आकडेवारी आली समोर
शेतकऱ्यांच्या एका निर्णयामुळे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होते. दरवर्षी कित्येक शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या (Farmers Suicide in India) करतात. दरम्यान, 2022 या वर्षासाठीचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) वार्षिक अहवाल सादर केला आहे. या अवाहलानुसार, यावर्षी देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ (NCRB Report) झाली आहे. यावर्षी जवळपास 11,290 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पडणार जोरदार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा
यात 6,083 शेतमजूर, 5,472 पुरुष शेतकऱ्यांचा आणि 611 महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील 4 हजार 248 शेतकऱ्यांनी आपले आयुष्य (Farmers Suicide in Maharashtra) संपवले आहे. देशात 2021 मध्ये 10 हजार 281 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. यात यंदा 3.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी हा आकडा 11 हजार 290 पर्यंत गेला आहे. 2020 मधील शेतकरी आत्महत्त्यांच्या आकडेवारीच्या तुलनेत यावर्षीचा आकडा 5.7 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
Success Story । मानलं बुवा! शिक्षकाचा शेतीत यशस्वी प्रयोग, मिळवलं पेरूचं 24 लाखांचं उत्पादन
आत्महत्येबाबत महाराष्ट्र अग्रेसर
आत्महत्येबाबत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. तर दुसरा क्रमांक कर्नाटक या राज्याचा लागतो. येथे तब्बल 2 हजार 392 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. आंध्रप्रदेशमध्ये हा आकडा 917 आहे. विशेष म्हणजे यावर्षी उत्तराखंड, गोवा, मणिपुर, पश्चिम बंगाल, ओडिसा, त्रिपुरा, मिझोराम, चंदीगड, लक्षद्वीप आणि पुदुचेरी येथे एकाही शेतकऱ्याने आपले जीवन संपवले नाही.
Inflation । सर्वसामान्यांना मोठा झटका! ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किमती
गेल्या वर्षी देशातील शेती क्षेत्राची परिस्थिती खूप नाजूक राहिली होती. अनेक भागांत शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे लागत होते. या आकडेवारीमध्ये 11,290 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपैकी 53 टक्के आत्महत्या शेतमजूर असणाऱ्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेती क्षेत्रातील घटत्या जमिनी धारणेमुळे शेतमजुरी करण्याचे प्रमाण वाढले आहे, असेही या अहवालात नमूद झाले आहे.
Supriya Sule । राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी