Farmers Protest

Farmers Protest । विविध मागण्यांवर शेतकरी ठाम! देशभरात काढणार कँडल मार्च, सरकारचाही पुतळा जाळणार

बातम्या

Farmers Protest । पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी किमान आधारभूत किंमत (Minimum base price) आणि इतर काही मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांना घेरले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. (Farmers Strike)

Eggs Rate । अंड्यांच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या नवीनतम दर

देशभरात काढणार कँडल मार्च

अशातच आता शेतकरी आंदोलनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज शेतकरी देशभरात कँडल मार्च (Candle March) काढणार असून शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. रस्त्यांवर बॅरिकेड्स टाकले टाकून रस्त्यावर लोखंडी खिळे अंथरले आहेत. आंदोलकांवर अश्रूधुराचा मारा केला जात आहे.

Intercropping । शेतकरी बांधवांनो, उसात घ्या ‘ही’ आंतरपिके; अवघ्या 3 महिन्यात होईल लाखोंची कमाई

सरकारचाही पुतळा जाळणार

दर्शन सिंह (Darshan Singh) यांच्यासह इतर तीन मृत शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ कँडल मार्च काढणार आहे. तसेच शंभू आणि खनौरी या दोन्ही ठिकाणी जागतिक व्यापार संघटना, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सरकारचा पुतळा जाळण्याचा इशारा आंदोलक शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे. दिल्ली येथील आंदोलनात आणखी एका आंदोलकाचा मृत्यू झाला असल्याने दिल्लीकडे जाणारा मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत थांबवला आहे.

Ajit Pawar । ‘कांदा, सोयाबीन, कापसाच्या दरावरून आम्हाला राजकारण करायचं नाही’; अजित पवार स्पष्टच बोलले

याबाबत पुढील रणनीती २९ फेब्रुवारीला ठरवली जाणार आहेतसेच २६ फेब्रुवारी रोजी जागतिक व्यापार संघटनेसह कॉर्पोरेट आणि सरकारचा पुतळा जाळण्याचा इशारा दिला आहे. शंभू आणि खनौरी या दोन्ही ठिकाणी २६ फेब्रुवारी रोजी जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकांचा शेतकऱ्यांवर कसा परिणाम होतो यावर चर्चासत्र आयोजित करणार असल्याची माहिती मजूर किसान मोर्चाचे नेते श्रवण पंढेर यांनी दिली आहे.

Ethanol Production । मका उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! इथेनॉल निर्मितीसाठी होणार मकेची खरेदी, जाणून घ्या दर

दरम्यान, केंद्र सरकारने सरकारी संस्था शेतकऱ्यांकडून हमीभावाने पाच वर्षांपर्यंत डाळी, मका आणि कापूस खरेदी करतील असा प्रस्ताव देण्यात आला होता. पण हमीभावासाठी कायदा (Act for Guarantees) आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू करण्याची मागणी करत आंदोलक शेतकऱ्यांनी तो प्रस्ताव फेटाळला होता.

Havaman Andaj । ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *